सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

                                             महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आले,संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य जमीर शेख  , उपप्राचार्य अनिल खुजे यांचा हस्ते सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला  मार्ल्यापण करून अभिवादन करण्यात आले .

 

                                             कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती देत असताना ह्या दिवसाला बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो  तसेच  या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या ,स्त्रीशिक्षनाच्या आरंभित टप्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली,भिडेवाड्यात भारतातील मुलीची पहिली शाळा सुरु केली,शाळेत  सावित्रीबाई फुले ह्या  प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून काम केले .

 

                                             तसेच सावित्री बाई फुले यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी विवाह झाला, केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी  प्रयंत्न करणे अशी अनेक कामे सावित्रिबाई कल्पकतेने पार पाडली , या मराठीतील पहिल्या कवयित्री होत्या.

 

                                          ह्या  कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर   कर्मचारी उपस्थित होते.

Previous post लावणी नृत्यविष्कार गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियोजन बैठकीचे आयोजन…
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात विधार्थ्यांसाठी अल्युमणी प्रोग्रामचे आयोजन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News