

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात दिनांक ३ जानेवारी २०२६ ला (अल्युमणी प्रोग्राम) माजी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये सर्वप्रथम सर्व विधार्थांचे पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले ,प्रा.पी.पी.सुत्राळे , प्रा.बोबडे सर ,प्रा.कोटकर मॅडम यांनी विधार्थाना समयोचित मार्गदर्शन केले, त्यामध्ये ज्याचा उद्देश जुन्या आठवणींना उजाळा देणे, शिक्षकांशी पुन्हा जोडणी करणे आणि करिअर मार्गदर्शन, शालेय विकासात मदत यांसारख्या कामातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे हा असतो. महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून माजी विद्यार्थी शालेय विकास आणि शिक्षणात मदत करू शकतील, तसेच स्नेहसंमेलने आयोजित करून जुन्या दिवसांची आठवण ताजी करू शकतील.
तसेच विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची एक मजबूत नेटवर्क तयार करणे ,सामाजिक कार्य विद्यार्थी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात.,त्यांचा वेळ आणि कौशल्य स्वयंसेवा करणे किंवा सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे यांचा समावेश होता.
थोडक्यात म्हणजे माजी विद्यार्थीनसाठी कार्यक्रम हे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे, जो शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरतो.
या कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य एम.झे .शेख ,उपप्राचार्य अनिल खुजे तसेच सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यपक आणि विधार्थ्यां उपस्थित होते, सूत्र संचालन प्रा. नौशाद सर यांनी केले.
