

उत्कृष्ट महिला मंच व सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित लावणी नृत्यविष्कार गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियोजन बैठकीचे आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज वडगाव येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे ओळख असलेली लावणी या पारंपरिक नृत्य प्रकारची जगाच्या पाठीवर ओळख निर्माण व्हावी व येणाऱ्या पिढीला याचे महत्त्व आणि जाण असावे या हेतूने उत्कृष्ट महिला मंच तसेच सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी चांदा क्लब ग्रॉउंड चंद्रपूर येथे पाच हजार महिला एकाच वेळेस सतत वीस मिनिटे वीस लावण्याचे सादरीकरण करणार असून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
त्या संदर्भात श्री .पांडुरंग आंबटकर चेअरमन सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तसेच वैरागडे अध्यक्ष उत्कृष्ट महिला मंच यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . बैठकीची सुरुवात प्रस्तावनेने झाली तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली . कार्यक्रम स्थळी असणारी व्यवस्था, दर्शनीय स्थळाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, भोजन व निवास व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था इत्यादी बाबींवर विशेष चर्चा करून नियोजन करण्यात आले.
कार्यक्रम दर्शनीय स्थळी (दर्गा ग्राउंड) विविध स्टॉल्स आणि प्रेक्षकांना पाहण्याची व्यवस्था मोठ्या स्क्रीनवर करण्यात आलेली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या ग्राउंड वर पार्किंगची व्यवस्था देखील करण्याचे ठरले आहे. कार्यक्रम दरम्यान आरोग्य व्यवस्था तसेच साफसफाई आणि सुरक्षा व्यवस्था इत्यादी विविध बाबींवर चर्चा होऊन सर्व प्रकारचे बारीक नियोजन करण्यात आले.
बैठकीला सुहास अल्मस्त, स्नेहल बांगडे ,साक्षी कर्लेकर, सोनाली धनमने ,प्रीती बल्लावार, मेघा अंदणकर, प्रज्ञा जीवनकर, नंदराज जीवनकर, सागरं अंदणकर, सारिका बोराडे, पूजा पडोळे ,अर्चना सहारे तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद ,सर्व संघटिका व सर्व कोरिओग्राफर्स यांचा सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता करीना वांढरे ,विवेक तोहगावकर, परेश गहूकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
