महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी वडगाव रहवासी शाळेतील विद्यार्थ्यांनची ज्युनियर राज्य स्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत निवड करण्यात आले,
त्यामध्ये महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मानतेने चंद्रपूर जिल्ह्या असोसिएशन ,चंद्रपूर निवड चाचणी स्पर्धा २०२४-२५ जिल्ह्या क्रीडा संकुल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते ,१७ वर्षा खालील विध्यार्थानची स्पर्धा होती, त्यामध्ये मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी वडगाव राहवासी शाळेतील विद्यार्थ्यांनची ज्युनियर मंथन मेश्राम आणि नैतिक राव यांची निवड झाली.
तसेच बुलढाणा जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या सौजन्याने दिनांक १८ ते २० ओक्टोम्बर २०२४ रोजी ३५ वी मुले मुली ज्युनियर राज्य स्तरीय अजिंक्य पद घेण्याचे निश्चय झाले असून ह्या स्पर्धेतून तामिडनाडू येथे होणाऱ्या ज्युनियर स्पर्धेकरिता संघ निवडण्यात येईल,त्याकरिता संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाडऊन त्यांना मार्गदर्शन केले तसेच पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा.राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.
तसेच विधार्थाना मार्गदर्शन करीत क्रीडा प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे आणि टीम मॅनेजर राजकुमार जांभुळे यांनी परिश्रम घेतले.