‘’ वाचन प्रेरणा दिवस ‘’
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ‘’वाचन प्रेरणा दिवस ‘’ म्हणून जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी उपप्राचार्य श्री.जमीर शेख सर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विषयी विधार्थांना अनमोल मार्गदर्शन करीत असताना हे एक भारतीय शास्त्रज्ञ होते,माझी राष्ट्रपती स्व.डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्मुर्ती जतन करण्याच्या उद्धेशानी यांच्या जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावे,तसेच त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैन्नुलाब्दीन होते .
कलाम हे “भारताच्या कल्पनेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होते, ज्यांनी सर्व सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरांना मूर्त रूप दिले होते जे भारताच्या अफाट विविधतेत एकात्मतेचे प्रतीक होते. हे सर्वात उल्लेखनीयपणे स्पष्ट होते- ते शेवटचे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले,
तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती होते,त्यांनी शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण ,संशोधन,विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था,येथे काम केले,अशा प्रकारे बॉलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानांच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले,शिक्षण,लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले,भारताचा सर्वच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न अशे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले.
ह्या कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले.