जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयुष समितीची सभा

चंद्रपूर : कोरोना आजारापासून आयुष चिकित्सा पद्धतीद्वारे संरक्षण मिळविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदद्वारे उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे सहअध्यक्षतेखाली आयुष समितीचे गठण करण्यात आले. सदर समितीची (डिस्ट्रिक्ट टास्क फॉर्स ऑन आयुष फॉर कोविड) सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेत 19 ‌मे रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पार पडली.

सदर सभेत जिल्ह्यांतर्गत कोविड-19 यासाठी रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रोग प्रतिकारशक्ती वाढविणे या विषयावर चर्चा होऊन आयुष अंतर्गत आयुर्वेद होमिओपॅथी युनानी चिकित्सा द्वारा देण्यात येणारी औषधे व चंद्रपूर जिल्हा करिता आयुष औषध धोरण आयुष औषधी घटक निश्चित करण्यात आले तसेच आयुष मंत्रालय द्वारा शिफारस करण्यात आलेल्या आयुष्य चिकित्सा पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन राऊत तसेच चंद्रपूर शहरातील नामांकित तज्ञ अध्यक्ष आयुर्वेद व्यासपीठ डॉ. राजीव धानोरकर, प्रभारी प्राचार्य विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालय डॉ. संदेश गोजे, अध्यक्ष निमा डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे, प्राचार्य पीबी होमिओपॅथी महाविद्यालय डॉ.उमेश मादयासवार, वरिष्ठ होमिओ तज्ञ डॉ. के. बी.गौरकार, डॉ.सुचिता वैद्य व इतर आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागाचे डॉ.प्रतिक बारापात्रे (आयुर्वेदाचार्य), डॉ. राजेश कांबळे (होमिओपॅथिक तज्ञ), डॉ. मोहसिन सय्यद (युनानी तज्ञ) व आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अकील कुरेशी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Previous post ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चिमूर तालुक्यातील विविध ठिकाणी केला व्यक्त निषेध
Next post कंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News