सोमय्या पॉलीटेक्नीक येथे गुढी उभारून नवं वर्षाचे स्वागत

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव येथे नवं वर्षाचे स्वागत करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्थित  होते, तसेच गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले .

संस्थेचे अध्यक्ष भाषण देत असताना नवीन वर्षाचे स्वागत करीत सर्वाना शुभेच्छा दिल्या. गुढी पडावा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस,हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो.महाराष्ट्रत मोठया उत्साहाने सण साजरा केला जातो.या दिवशी गुढी उभारली जाते,या गुढीला विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

तुम्हाला आनंद आणि समृद्धी देओ, नवीन सकाळ, नवीन अशा, यश, नवीन योजना, तसेच नवीन वर्ष हे सुखमय जाओ, नव्या उमेदीने झेप घेऊन नवं वर्षाचे स्वागत केले, शिक्षकांनी नव्या संकल्पना, आपले ध्येय पूर्ण करण्याची नव्या जुन्या आठवणी सांगत विचार मांडले.

हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.

Previous post सोमय्या पॉलिटेक्नीक येथे जागतिक महिला दिन साजरा
Next post सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल तर्फ गायत्री शक्तीपीठ येथे निशुल्क चिकित्सा शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News