
शांतिकुंज हरिद्वार २४ कुण्डिय गौ -पुष्टी गायत्री महायज्ञ उदघाटन समारोह करण्यात आले.त्यामध्ये सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल तर्फ गायत्री शक्तीपीठ येथे आरोग्य निशुल्क दोन दिवसीय शिबीर समारोह २५ मार्च ते २६ मार्च २०२३ ला आयोजित करण्यात आले.
सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॉलेज स्वास्थ आरोग्य शिबिरात २७० नागरिकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घेतला , आयुर्वेदिक उपचार हि काळाची गरज असून , नागरिकांनी सर्व आयुर्वेदिक उपचारांचे महत्व जाणून घेतले.
संस्थापक चे अध्यक्ष श्री पांडुरंग आंबटकर यांच्या नेतुर्त्वत शिबीर आयोजित करण्यात आले,यांनी निशुल्क सेवा देत त्यांनी सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल मधील ड्रॉक्टर तसेच कर्मचारी यांनी तपासणी करून सेवा समर्पित करून प्रत्येकानी आपला खारीचा वाटा उचलला.सर्व प्रकारचे निदान व उपचार तसेच मोफत मेडिकल चेकप ,औषधी वितरण सेवा,BP,SUGAR,ECGअशा अनेक सेवा देऊन शिबीर समारोह चे आयोजन केले.
तसेच गायत्री शक्तीपीठ चंद्रपूर यांनी सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर याना सन्मान करीत धन्यवाद करण्यात आले.