सोमय्या पॉलीटेक्नीक येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्तित होते.

स्वामी विवेकानंद यांचा बद्दल माहिती दिली, स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते,त्यांचा जन्म १२ जानेवारी मध्ये कलकत्ता येथे झाला.ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते, ते शाळेतील सर्वात हुशार विधार्थी होते,

रामायण,महाभारत,भगवतगीता,वेद आणि पुराणे यांचा त्यानी सखोल अभ्यास केला होता.रामकृष्ण परमहंस हे नरेंद्रनाथाचे गुरु होते,गुरूंनीच त्यांना  विवेकानंद हे दिले, त्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार जगभर करण्याचे कार्य केले,तसेच शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांचा भाषणाचा सर्वावर प्रभाव पडला तेथूनच ते विश्वप्रसिद्ध झाले. तसेच  त्यांनी संपूर्ण भारतभर ज्ञानदानाचे व समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडले त्यांचा जन्मदिवस  ‘’राष्ट्रीय युवा दिन ‘’ म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .

Previous post सोमय्या पॉलीटेकनिक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे राष्ट्रीय मतदार दिन शपथविधी

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News