सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे वनदिवस साजरा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेज वडगांव चंद्रपूर अंतर्गत वन दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख ,रजिस्टार श्री. बिसन, उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरूवात सर्वप्रथम वृक्षरोपण करून करण्यात आली.
”झाडे लावा आणि झाडे जगवा
सुजल,निर्मळ भविष्य घडवा“
पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या वचन बध्दतेला नवी प्रेरणा देण्यासाठी सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे वन दिवस साजरा करण्यात आला. आपल्या विकासाच्या आणि सौदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळयांना सुंदर दिसणार वास्तव्य पृथ्वीच्या आणि येणा-या जिवनावर उठणार आहे. या दिवशी वृक्षारोपन तसेच पर्यावणाविषयी उपक्रम व कार्याक्रमाचे आयोजन करून पर्यावरण रक्षणाचे म्हणजेच वसुंधरेच्या रक्षणाची शपथ घेतली जाते.
”धरतीमाता माय आपली
रक्षण तीचे करू चला
झाडे लावू,प्लास्टिक बंदी
थोडे नियम पाळू चला.“
पर्यावरणाची काळजी, जतन, सौरक्षण, केले पाहीजे. निसर्गातील पृथ्वी,वायु, जल, अग्नी, आकाश, पंचतत्वावर आधारीत यांचे सौरक्षण करणे महत्वाचे आहे. सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेजच्या परीसरात वृक्षरोपण केले.
” परिसर ठेवून स्वच्छ नेटका,
फळा-फुलांच्या बागा सजवू
तलम रेशमी शालु हिरवा,
प्रकृ्रतीला पुन्हा नेसवू.“
या निसर्गाच्या पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगीकारल्याशिवय आपण निसार्गासोबत जगू शकरणार नाही.आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहाणार नाही.म्हणून सर्व सोबत येवून तेथे या निसार्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी वृक्षरोपण अभीयान राबविला. सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेजमधील सर्व शिक्षक कर्मचा-यांनी वृक्षरोपण करण्याची प्रतीज्ञा घेत सर्व नियमांचे पालण केले.
हया कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे विभाग प्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous post जागतिक महिला दिन सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे उत्साहात साजरा
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक मध्ये शहीद दिवस…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News