महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे क्रांतिवीर शहिद दिवस करण्यात आला. सर्व प्रथम क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियूष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, उपस्थित होते.
”ऐ मेरे वतर के लोगो जरा आंख मे भरलो पाणी.
जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी “
या दिवशी 23 मार्च 1931 ला क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग, आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. म्हणून हा दिवस शहीद म्हणून ओळखला जातो. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भावपूर्ण आदरांजली दिली.
या प्रसंगी संस्थेचे विभगप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर प्रामुख्याने उपस्थित होते.
”शहिदो कि चिताओ पर लगेंगे हर बरस मेले.
वतन पर मरणे वालो का यही बाकी निशा होगा.“