महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे श्री गुरू गोविंद सिंग यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर सर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर सर, प्राचार्य श्री. जमीर शेख सर, रजिस्टार राजेश बिसन सर, उपस्थित होते.
सर्व प्रथम दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर सर यांच्या हस्ते गुरू गोविंद सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले,त्या नंतर गुरू गोविंद सिंग हयाच्या विषयी सांगत असतांना गुरू गोविंद सिंग यांच्या संपूर्ण जीवनातून आपल्याला अन्याया विरूध्द लढण्याची प्रेरणा मिळते. गुरू गोविंद सिंग असे एक ऐतिहासिक पुरूष होते,त्यांची लढाई अधर्म,अत्याचार आणि अन्यायाविरोधात होती.
श्री. गुरू गोविंद सिंग यांना लहान पणी गोविंदराय या नावाने ओळखत होते, गुरू गोविंद सिंग हे शिखांचे 10 वे गुरू होते,गुरू गोंविद सिंग यांची जयंती शिख समुदयाला खूप महत्वपूर्ण आहे, कारण गुरू गोविंद सिंग नी शिख धर्माच्या लोकांना सकारात्मक गोष्टी सांगितल्या आहे. ते एक महान पिता गुरू तेग बहादुर सिंग यांचे पुत्र होते, ते शिखांचे नववे गुरू होते, गुरू गांेविद सिंग यांनी पवित्र गुरूग्रंथ साहेब ला पूर्ण केले. त्यांनी खालसा पंथा ची स्थापना केली, त्यांनी लोकांना सांगितले की धन संपत्ती घमंड करू नका, तसेच गरिबाला दान दिले पाहिजे, दुःखात असणारे किंवा अडचणीत असणा-याला मदत केली पाहिजे, स्वतःला कधी वाईट सवयी लावू नका, आपले कार्य निष्ठा,आवडीने प्रामाणिकपणे करावे. त्यांनी शिख समाजाला राजकीय जगृती निर्माण केली.”पंच कंकार“ (केस,कंगवा,कच्छ,कडे,कृपाण )धारण करू लागले.शौर्य आणि राष्ट्रभ्क्ती या गुणाचा त्यांनी आपल्या शिकवणीत अग्रस्थान दिले.
गुरू गोविंद सिंग यांनी जी शिकवण दिली ती आज ही एक आदर्श आहे. कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका,”देहि शिवा वर मोहि दुहे,शुभ कर्मन ते कबहु न टरौ!“ पण चांगले कर्म करतांना मागे हटु नका मग त्याचा परिणाम काहीही होवो असं गुरू गोविंद सिंग यांनी सांगितले आहे. तसेच जिवणातुन आपल्याला प्रत्येक प्रकारचे अत्याचर आणि अन्याया विरूध्द लढण्याची प्रेरणा मिळते.
हया कार्यक्रमाकरीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.