सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे लाला लजपतराय यांची जयंती साजरी

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे स्वातंत्र्य लढयात मोलाचे योगदान असलेले जहाल मतवादी क्रांतीकारी लाला लजपतराय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियूष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, रजिस्टार श्री. राजेश बिसेन उपस्थित होते. प्ररंभी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी श्री. प्राचार्य जमीर शेख यांनी समयोचित मर्गदर्शन करीत असतांना लाला लजपतराय हे पंजाबी लेखक व राजकारणी होते, भारतीय स्वातंत्र्य लढयात त्यांनी मोलाचे योगदान दिले, ते जहाल मतवादी नेते होते, त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात, पंजाब केसरी या नावाने प्रसिध्द असलेले लाला लजपतराय हे भारताचे प्रसिध्द स्वातंत्र सेनानी होते, त्यांनी आपल्या भावां समवेत आणि मित्राच्या हंसराज व गुरूदत्त यांच्या सोबतीने, दयानंद अॅम्लो विद्यालयाची स्थापना, पंजाब नॅशनल काॅलेज लाहोरची स्थापना, पंजाब नॅशनल बॅंकेची स्थापना केली.
तसेच हिंदू महासभेतील महत्वाच्या सदस्यापैकी एक लाला लजपतराय 1920 मध्ये अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे काॅंग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी पंजाबमधील असहकार चळवळीचे नेतृत्वही केले. 1921 मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या ” ना नफा “ तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली,
गुलामगीरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता लाला लजपतराय यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला आणि ते लाहौर येथे शहीद झाले. देशासाठी संपूर्ण राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणारे त पहिले भारतीय नेते होते.
हया कार्यक्रमाकरीता सर्व प्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे गुरू गोविंद सिंग जयंती साजरी
Next post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News