
कोरोना रुग्णांची संख्या पोहचली १३ वर
गडचिरोली : ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता दिवसागणित कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असून मुंबई येथून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या आणखी ४ जणांचे अहवाल सुक्रवारी (ता.२२) कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे. कोरोना बाधीतांची सःख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये कुरखेडा येथील २, चामोर्शी १, गडचिरोली (मुळगाव कोरची) १ अशा एकूण ४ जणांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबई येथून आले असून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने १७ मे पर्यंत हा जिल्हा ग्रीनझोनमध्ये होता. मात्र ,१७ मे च्या रात्री उशिरा एकाच दिवशी तब्बल ५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले. त्यानंतर कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आजच्या अहवाला नंतर कोरोनाबाधीतांची संख्या १३झाली आहे.
……