
चंद्रपूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवल्यानंतर केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली. मागील तीन महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व किरकोळ व्यवसायिक पानठेला धारक बंद आहेत त्यामुळे या सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. या व्यवसायिकांन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याकङे केली.
सध्या जिल्ह्यामध्ये संचारबंदीत शिथलिताी देण्यात आली असून सर्व महत्त्वाची दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली. मात्र पानठेला धारकांना उघडण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. मागील तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने कौटुंबिक परिस्थिती आणि आर्थिक स्थिती हालाखीची झाली आहे. अशा स्थितीत या पानठेला धारकांना त्यांच्या किरकोळ दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी पानठेलाधारकांनी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सदस्य एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या मार्फतीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. अशा आशयाचे निवेदन देखील एडवोकेट पारमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांना पाठविले.