सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज च्या विधार्थानी (IEDSSA) विविध क्रीडा क्षेत्रात उंच भरारी

इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विद्यार्थी आणि विधार्थीनीचे चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडांगणावर उंच भरारी घेऊन संस्थेचे नाव मोठे केले आहे.

आयोजित भव्य ऍथलेटिक्स स्पर्धेत सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीअरिंग चंद्रपूर येथील विद्यार्थांनी

उत्कृष्ट प्रदर्शन करून  संस्थेचे नाव मोठे केले,

हि स्पर्धा श्री.साई पॉलिटेक्निक कॉलेज चंद्रपूर यांनी  जिल्हा क्रीडांगणावर आयोजन करण्यात आली,  या स्पर्धेतमध्ये  नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली पॉलीटेक्नीक कॉलेज आणि फार्मसी संघानी भाग घेतला होता.

यात मुलांच्या १५००  मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रलय नगराळे मेकॅनिक इंजिंजीरिन याने द्वितीय क्रमांक पटकावले, लाँग जंप या खेडामध्ये विशाल दुर्गम याने द्वितीय क्रमांक पटकावले तसेच जावेलिंग थ्रो मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग चा विद्यार्थी अभिजित मुंडे याने प्रथम क्रमांक पटकावले .

 

तसेच मुलींच्या स्पर्धेत मायनिंग इंजिनियरिंग  ची विद्यार्थिनी लक्ष्मी भोयर जावेलिंग थ्रो मध्ये  विजेती , तर डिस्कस थ्रो स्पर्धेत  उपविजेती राहिली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून आपली छाप पाडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य अनिल खुजे यांनी विधार्थांचे अभिनंदन केले. तसेच क्रीडा प्रमुख प्रा .कमलेश ठाकरे आणि प्रा. धनश्री कोटकर तसेच टीम प्रबांधक नॅन्सी राऊत यांनी मौलाचे मार्गदर्शन केले.

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लयसमेंटद्वारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कंपनीत निवड
Next post कॅरम स्पर्धेत सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विधार्थ्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News