कॅरम स्पर्धेत सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विधार्थ्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन

(IEDSSA) इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विधार्थीचे कॅरम स्पर्धेचे  सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजची विधार्थिनीनि उत्कृष्ट प्रदर्शनी करून बाजी मारली.

तसेच कॅरम स्पर्धेत सिंगल आणि डबल इव्हेंट कॅरम मध्ये वर्ष २०२५ – २०२६ कामठी नागपूर येथे  स्पर्धेत आयोजन करण्यात आले , त्यामध्ये धीरज निखाडे संघनक विभागातील तृतीय विभागातील ,तुषार राठोड मायनिंग विभागातील,आदित्य वनकर मायनिंग प्रथम वर्षातील,कमल चटर्जी मायनिंग प्रथम वर्षातील विधार्थी तसेच कुणाल पोइंकर मायनिंग तृतीय विभागातील शिकत असणारे विधार्थी यांनी  क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी  पात्र झाले आहे.

संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर , उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख ,उपप्राचार्य अनिल खुजे यांनी विध्यार्थाचे हार्दिक अभिनंदन केले, तसेच क्रीडास्पर्धेचे भार संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि  संघ संचालक म्हणून प्रा.प्रतीक दातार आणि प्रा.विजय थेरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज च्या विधार्थानी (IEDSSA) विविध क्रीडा क्षेत्रात उंच भरारी
Next post सोमय्या महाविद्यालयाच्या यशामागे MSPM Group चे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर यांची प्रेरणादायी भूमिका

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News