वङिलाने मुलाला, तर मुलाने बापाला ठार मारले

दोन घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला

यवतमाळ : चार्जिंगला लावलेला मोबाइल फोडल्याच्या कारणातून राग अनावर झाल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलांचा खून केला. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्‍यातील हिवरा (संगम) येथे सोमवारी (ता.18) दुपारी घडली. तर दुसऱ्या घटनेत दारूच्या नशेत वडिलांनी दीड वर्षीय मुलाला जमिनीवर आदळून संपविले. ही घटना पांढरकवडा तालुक्‍यातील गणेशपूर (वाई) शेतशिवारात रविवारी (ता.17) रात्रीदरम्यान घडली. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात जनमानस सुन्न झाले आहे.

हिवरा (संगम) येथे झोपडपट्टीलगत असलेल्या वसाहतीत एक कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुलाने चार्जिंगला लावलेला मोबाइल आईला मागितला. त्यावेळी वडिलांनी मोबाइल फोडला. मारहाणीत वडिलांच्या डोक्‍यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून मुलाच्या हाताला कोणतेही काम नव्हते. वडील दारूच्या नशेत नेहमी मुलाला मारहाण करीत होते. मोबाइल फोडल्याने मुलाचा राग अनावर झाला. त्याने वडिलांचा खून केला. महागावचे ठाणेदार दामोदर राठोड, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

Previous post मजूर घेऊन जाणाऱ्या एस टी बसला अपघात, चार मजूर जागीच ठार
Next post नवनवीन कल्पना आखून दारुची तस्करी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News