सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी कॉलेजच्या विध्यार्थांची UNIJULES येथे औदयोगिक भेट

                                       महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या कॉलेज चंद्रपूर ने UNIJULES LIEF SCIENCES LTD.NAGPUR  दिनांक १ फरवरी २०२६ ला डीफार्मसी  द्वितीय वर्षातील विध्यार्थ्यांसाठी  नुकतीच एक दिवसीय औदयोगिक भेट आयोजित करण्यात आली,त्यामध्ये विधार्थाना पुस्तकी ज्ञासोबतच प्रत्येक्ष उत्पादनाची प्रक्रिया घेता यावी,तसेच कंपनीचे व्यवस्थापक श्री.महेंद्र सर यांनी माहिती देत सुरक्षेचे नियंत्र समजावून सांगितले आणि उत्पादन विभागातील कच्च्या माल ( RAW MATERIAL ) प्रक्रियेपासून ते अंतिम पॅकेजिंग (FINAL PACAGING) पर्यंतच्या टप्पा विधार्थानी समजून घेतला,कंपनीच्या तांत्रिक टीमने कालीटी कंट्रोल आणि सप्लाय चैन मॅनेजमेंट बद्धलची मौल्यवान माहिती दिली.

                        विधार्थाना औषध निर्माण करण्याची प्रक्रियेचे ज्ञान,वेळेचे नियोजन,वातावरण आणि कार्य संस्कृती समजण्यास मो ठी  मदत झाली. भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. या अभ्यासभेटीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत औद्योगिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले, ज्याचा उपयोग त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

 

                                           या शैक्षणिक भेटीचे आयोजन विभागाचे प्रमुख प्रा. मोझेस  दुर्गावाड, प्रा.निकिता,प्रा .पूजा,प्रा.कीर्ती,प्रा .विजय,सोनाली, स्नेहा यांच्या पुढाकाराने पार पडला.

तसेच कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांनी  विध्यार्थाना सहकार्य केले.

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विधार्थिनीची टेबले टेनिस स्पर्धेत ज़िल्हा स्तरीय निवड श्री.पी.एस.आंबटकर यांनी विधार्थांचे केले कौतुक …….
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लयसमेंटद्वारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कंपनीत निवड

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News