श्री.पियुष आंबटकर २०२४ उद्योजक गौरव पुरस्कारांनी सन्मानित

                              मुंबई येथे आयोजित स्विफ्टनलिफ्ट मीडिया ग्रुप  च्या वतीने  फिल्म प्रोडूकशन एक्सलण्ट अवॉर्ड देण्यात आले. तसेच त्यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करीत असलेले सोमय्या ग्रुपचे उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर याना गौरवून त्यांना सर्वात प्रतिष्ठित प्रमुख अतिथी पूजा सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

                               फिल्म निर्मिती सोबत अतिशय मेहनत ,दृढ निश्चय ,एकाग्रता, तल्लक बुद्धीने त्यांनी अनेक शाखा उभ्या केल्या, फिल्म निर्मातेसोबत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करीत नाव आलोकनीय केले, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील चंद्रपूर जिल्ह्यात विध्यार्थाना काळासोबत धावणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने काही वर्षांपूर्वी सर्व संस्थेची स्थापना केलेली होती , उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर म्हणतात माझे जीवन आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करीत असूनसेवा हीच परमधर्मआहे, यांनी नव्या युगात नवीन पिढीच्या जळणघडणी नुसार शैक्षणिक बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे.विदर्भातील सर्वात मोठी आणि जुनी शिक्षण संस्थेचे मागील काही वर्षांपासून अध्यक्ष आहेत.सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सदैव अग्रस्थानी राहिले.

                           श्री.पियुष आंबटकर यांनी आपले मत व्यक्त करीत आज मी माझ्या जीवनात जे काही यश संपादन केलेले आहे,जे काही कार्य कर्तृत्व गाजविले आहे ते भवानी मातेच्या कृपेने आणि माझे वडील श्री.पी.एस.आंबटकर यांच्या आशीर्वादानेच.

                         सोमय्या ग्रुपचे संस्थापक श्री.पी. एस. आंबटकर (वडील),सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर (आई) , डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर (पत्नी), याना श्रेय दिले तसेच , प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के सर ,रजिस्टर श्री.बिसन सर तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थिनीचा ऍथलेर्टिक स्पर्धेत घवघवीत यश
Next post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे उत्साहात शिवजयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News