महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित Mspm ग्रुप तर्फ कॉलेज वडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य डॉ.गाडगे ,उपप्राचार्य खुजे, रजिस्ट्रार श्री.बिसन तसेच प्रमुख पाहुणे राजीव गांधी इंजिनी यरिंग कॉलेज चे संस्थापक श्री. विनोद द त्तात्रे सर, प्रा.रॉय सर मंचावर उपस्तित होते,Mspm ग्रुपचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला मार्ल्यापण केले आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विध्यार्थाना माहिती देत असताना ह्या दिवसाला बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या ,स्त्रीशिक्षनाच्या आरंभित टप्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.भिडेवाड्यात भारतातील मुलीची पहिली शाळा सुरु केली,शाळेत सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून काम केले .
तसेच सावित्री बाई फुले यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी विवाह झाला, केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयंत्न करणे अशी अनेक कामे सावित्रिबाई कल्पकतेने पार पाडली , या मराठीतील पहिल्या कवयित्री होत्या.
ह्या कार्यक्रमामध्ये सर्व Mspm ग्रुप चे शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .