सोमय्या पॉलीटेक्नीकमध्ये नागपूर विभागीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव पटांगणात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के सर,प्रा.अनिल खुजे सर ,रजिस्टर श्री.बिसन सर मंचावर उपस्तित होते, सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून आणि रिबीन कापून स्पर्धेची सुरवात करण्यात आले.
IEDSSA आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित नागपूर विभागीय बास्केटबॉलचे आयोजन २९ जानेवारी २०२४ रोजी सोमय्या पॉलीटेक्नीक येथे आयोजित केले आहे.यास्पर्धेत नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली पॉलीटेक्नीक कॉलेज च्या चमूंनी भाग घेतला आहे.या स्पर्धेत अनेक विध्यार्थानी सहभाग नोंदविला आहे.या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धे घेण्यात येते,या विध्यार्थाना ज़िल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळते,हि स्पर्धा चांगली आणि खेळ भावनेनी व्हावी असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर असे आव्हान केले आहे.
यास्पर्धेकरिता सोमय्या पॉलीटेक्नीक, जी.पी.नागपूर,बी.आय.टी.पॉलीटेक्नीक, जी.एच.रायसोनि पॉलीटेक्नीक,यशोधरा बजाज फार्मसी,विवेकानंद पॉलीटेक्नीक सावंगी,इत्यादी संघ यांच्यामध्ये बास्केटबॉलचे सामने झाले. क्रीडा स्पर्धामध्ये सर्व विभागातील विध्यार्थ्यातांचा सहभाग नोंदविला होता तसेच या संघामध्ये माइंनिग विभाग ,इलेक्ट्रिकल विभाग ,मेकॅनिकल विभाग,सिविल विभाग,कॉम्पुटर विभाग,इलेक्ट्रॉनिक विभागचे तसेच फार्मसी विधार्थीचा ऊस्फूर्तने स्पर्धमध्ये भाग घेतला होता, त्यामध्ये प्रथम क्रमांक जी.एच.रायसोनि पॉलीटेक्नीक आणि उपविजेता यशोधरा बजाज फार्मसी संघ विजेते ठरले,सर्व विध्यार्थाना मानचिन्ह आणि प्रमानप्रत्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे भार सांभाळणारे प्रमुख प्रा. कमलेश ठाकरे ,प्रा.धनश्री मॅडम होता , तसेच सचिन चाफले,अल्ताफ खान ,टीम मॅनेजर प्रा.भारत बाबारे यांनी केले, तसेच या प्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा.नौशाद सिद्धकी यांनी केले.