बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव निवासी शाळेतील विध्यार्थी पात्र

बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव निवासी शाळेतील विध्यार्थी पात्र

जिल्हास्टेडियम येथे आयोजित केलेल्या मनपा स्तरीय / जिल्हा स्तरीय

शालेय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आले, बास्केटबॉल स्पर्धेत विध्यार्थानी घवघवीत यश प्राप्त करून मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव निवासी शाळेतील विध्यार्थाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

दरवर्षी प्रमाणे यंदाही मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या विध्यार्थाना शालेय टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक घेऊन यशाची उंची गाठली आहे. १७ वर्षाखालील विधार्थानी बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

त्यामध्ये महेश कोठारे,अनमोल बेलेकर,गौरव मोहुर्ले,मंथन मेश्राम,अभिनव पवार,यश सूरकर,वेदांत चहारे,सुरज भुसारी,करण कुंभारे,क्रिश मूलकलवार,वेदांत गेडाम ह्या विध्यार्थानी बास्केटबॉल स्पर्धेत विभागीय संघपात्रात निवड झाली.यामध्ये स्पर्धेचे निरीक्षक ज़िल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले होते, या स्पर्धेत विजयी झालेली विधार्थांचे अभिनंदन केले,

संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आणि समोर आयुष्यात प्रगती करावी अश्या शुभेच्या दिल्या, क्रीडा प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे,आल्ताफ खान यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व शिक्षकांनी विधार्थांचे अभिनंदन केले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती औचित्य साधून स्वछता अभियान 
Next post शिक्षणासोबत विध्यार्थ्यांच्या इतर गुणांना प्राध्यान्य ….. श्री. पी.एस .आंबटकर

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News