सोमय्या डिप्लोमा इन इंजिनेरींगच्या विध्यार्थाचे व्हेटलिफ्टिंग आणि रेस्लिंग स्पर्धेत सुवर्ण झेप

     महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंर्तगत विभागीय व्हेटलिफ्टिंग आणि  रेस्लिंग स्पर्धेत सोमय्या डिप्लोमा इन इंजिनेरींगच्या विध्यार्थाने यश प्राप्त केले, ह्या स्पर्धा नागपूर विभागीय अंर्तगत जी. एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनेरींग,नागपूर येथे आयोजित केले गेले होते,यास्पर्धेत  चंद्रपूर,नागपूर ,गोंदिया,भंडारा,गडचिरोली ह्या जिल्ह्यातून पॉलीटेक्नीक आणि फार्मसी विभागातून विधार्थांनी प्रतिनिधीत्व केले.

 

यात  मुलींच्या व्हेटलिफ्टिंग या स्पर्धेत कृत्तिका शुक्ला संगनक विभागातील द्वितीय  वर्षांतील  विधार्थीनि ६० किलो वजन  गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला ,तसेच अक्षय भोटकूरी मायनींग  द्वितीय वर्षांतील विधार्थिनीने  ५९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला,इंद्रजित सिंग बडवाल सिविल द्वितीय वर्षांतील विधार्थिनीने  ७७ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेच नेहा दुधे द्वितीय वर्षांतील विधार्थिनीने  ६० किलो वजन गटात व्हेटलिफ्टिंग मध्ये उपविजेती ठरली आहे.

तसेच मुलांच्या रेस्लिंग (कुस्ती) स्पर्धेत  वजन गटात ८० किलो वजन गटात अलतमश शाह सिविल विभागातील यांनी प्रथम क्रमांक मिळविला ,तसेच स्टीफन पेरका यांनी ७०  किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला आणि व्हेटलिफ्टिंग या स्पर्धेत शरद यडलवार ५६ किलो वजन गटात उपविजेता ठरले,विध्यार्थाना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

 

विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच जीवनातील खेळाचे महत्व लक्षात घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो,शरीराला तंदुरुस्त बनविण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असते, या स्पर्धेत अनेक विध्यार्थानी सहभाग नोंदविला आहे.या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धे घेण्यात येते,या विध्यार्थाना ज़िल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळते,हि स्पर्धा चांगली आणि खेळ भावनेनी व्हावी असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर असे आव्हान केले,तसेच उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर,डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर,प्राचार्य श्री. जमीर शेख, उपप्राचार्य श्री.अनिल खुजे यांनी विधार्थांचे अभिनंदन केले.

 

तसेच प्रा. नॅन्सी राऊत यांनी संघाची जवाबदारी घेतली आणि  क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे, प्रा.धनश्री कोटकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली, प्रा. नॅन्सी राऊत यांनी संघाची जवाबदारी घेतली आणि या यशाबद्धल सर्वत्र  कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले.

Previous post सोमय्या महाविद्यालयाच्या यशामागे MSPM Group चे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर यांची प्रेरणादायी भूमिका
Next post सोमय्या ग्रुप येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News