मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव येथील युगश्री पदमेकर हिने फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत राजस्तरीय निवड

   फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडीयम देवळी,ज़िल्हा वर्धा येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच कुस्ती स्पर्धेमध्ये  दोन दिवसीय क्रीडेचे आयोजन करण्यात आले,त्यात १७ वर्षातील आत  विधार्थांचा सहभाग झाला होता,या कुस्ती स्पर्धेत एकूण पाच,सहा संघाचा समावेशअसून,स्पर्धेचे निरीक्षक ज़िल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.

                         तसेच कुस्ती स्पर्धेत अकरावीत शिकत असणारी विधार्थिनी युगाश्री संजय पदमेकर हिने प्रथम क्रमांक पटकावून राजस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे .  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी चंद्रपूर विध्यार्थांनि   जास्तीत -जास्त टक्के गुण घेत निकालाची  परंपरा कायम जोपासली आहे, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वाल येऊन शाळेचे नाव मोठे केले आहे.

                   क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा ज़िल्हा क्रीडा परिषद,चंद्रपूर येथे मनपा स्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये १४ ते १७  वयोगटात घेण्यात आले,या स्पर्धेत मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी वडगाव या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी हा संघ प्रात्र झाला आहे.

                 या खेळाडूंना  संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले .विधार्थानी मार्गदर्शन केले क्रीड प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे यांनी परिश्रम घेतले.

Previous post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव क्रीडा स्पर्धेत विध्यार्थाना मनपा स्तरीय प्रथम क्रमांक
Next post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव निवासी शाळेतील विधार्थिनी युगश्री पदमेकर कुस्ती स्पर्धेत राजस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News