
क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या विद्यमाने राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,ह्या स्पर्धेत मॅकरून स्टुडण्ट अकॅडमी राहवासी शाळेतील विधार्थिनी युगाश्री संजय पदमेकर हिने तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव लौकिक केले,कुस्ती स्पर्धेचे आयोजन २३ ते २५ सप्टेंबरला तीन दिवस कोल्हापूरला घेण्यात आली होती.
तसेच कुस्ती स्पर्धेत अकरावीत शिकत असणारी विधार्थिनी युगाश्री संजय पदमेकर हिने प्रथम क्रमांक पटकावून राजस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र झाली होती, त्यात १७ वर्षातील आत विधार्थांचा सहभाग झाला होता,या कुस्ती स्पर्धेत अनेक संघाचा समावेशअसून,स्पर्धेचे निरीक्षक ज़िल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले होते.
या स्पर्धेत विजयी झालेली युगाश्री पदमेकर हिचे अभिनंदन केले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आणि समोर आयुष्यात प्रगती करावी अश्या शुभेच्या दिल्या, क्रीड प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे यांनी परिश्रम घेतले.