सोमय्या पॉलीटेक्निक येथे उपाध्यक्ष पियुष आंबटकर यांचा वाढदिवस

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्रात आदराने घेतले जाते संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमय्या पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतून या संस्थेचा जन्म झाला,तसेच श्री.पियुष आंबटकर यांचा पत्नी सौ.अंकिता आंबटकर यांच्या सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असलेली आस्था यामुळे शक्य झालेले आहे.

या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विधार्थ्याना जिल्ह्यात दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत,ते नेहमी यशश्वी व्हावे अशी कामना करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे  उध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर सर, सचिव सौ. प्रीती पांडुरंग आंबटकर,  सौ. अंकिता पियुष आंबटकर,  प्राचार्य शेख सर, रजिस्टर बिसेन सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post MSPM ग्रुप मध्ये शिक्षक दिन साजरा
Next post सोमय्या पॉलीटेक्निक मध्ये अभियंतादिन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News