MSPM ग्रुप मध्ये शिक्षक दिन साजरा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे MSPM  ग्रुप मध्ये शिक्षक दिन साजरा  भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी केले. असून या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सौ.अंकिता आंबटकर, सौ.प्रांजली मॅडम,प्रा. शोभना मॅडम ,प्रा. राजदा मॅडम,प्रा. फैय्याज सर,प्रा. शेख सर,प्रा..हिवरे सर,प्रा.दामले सर ,प्रा.डॉ.चव्हाण सर ,रजिस्टार बिसन सर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वलन करुन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन च्या प्रतिमेला तसेच माँ भवानी, माँ सरस्वती माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्षन केले.

“शिक्षक -अपूर्णाला पूर्ण करणारा”

“शिक्षक शब्दांना ज्ञान वाढविनारा”

“शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारा”

५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन प्रथमतः आई या गुरुला नंतर माझ्या वडील या गुरुना आणि ज्यांनी माझे  भविष्य घडविले त्या तमाम शिक्षकरूपी  देवांना नमन, शिक्षक  दिनानिमित्य शिक्षकांचा उत्साह स्पूर्ती वाढण्याकरिता दरवर्षी आयोजन करण्यात येते, तरी यावर्षी डॉन्स, गायन, फॅशन शो हे कार्यक्रम घेण्यात आले होते. विविध ग्रुपमधील शिक्षकांनी आपली कला सादर केली.      

शिकवता शिकविता  आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देनारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक …. संस्थेतील विविध शाळा व कॉलेज जातील शिक्षकांना  प्रोत्साहन पद आणि पहिला, दुसरा व  तिसरा क्रमांक देण्यात आला, तसेच उत्कृष्ठ शिक्षक कार्याबद्दल प्रोत्साहन प्रा. राजदा मॅडम याना मानचिन्ह देण्यात आले.

गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक परमॉन्ट कॉन्व्हेंट चे प्रा.सुरज सर, सोमय्या आय.टी. आय. मधील प्रा.पिंपळकर सर ,मॅकरून कॉन्व्हेंट वणी  आणि ग्रुप क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट प्रा.अरुणा मॅडम आणि ग्रुप याना  पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तसेच नृत्य स्पर्धेमध्ये  परमॉन्ट कॉन्व्हेंट प्रथम क्रमांक पटकावला, मॅकरून कॉन्व्हेंट वणी यांनी दुसरा क्रमांक, तृतीय क्रमांक सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेज वडगाव चंद्रपुर तसेच चौथा क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट भद्रावती यांचा आला. तसेच फैशन शो / रॅम वॉक परमॉन्ट कॉन्व्हेंट संस्थेतील पहिला क्रंमाक, दुसरा क्रंमाक मॅकरून कॉन्व्हेंट वणी व  तृतीय सोमय्या पॉलिटेक्नीक वडगाव चंद्रपुर यांनी पटकावला, आणी संस्थेतील शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाकरीता सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले.

Previous post गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया। दीन दुखियों के भाग्य विधाता। जय गणपति देवा।
Next post सोमय्या पॉलीटेक्निक येथे उपाध्यक्ष पियुष आंबटकर यांचा वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News