
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव येथे नवं वर्षाचे स्वागत करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्तित होते, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून सरस्वती मातेला वंदन केले.
कार्यक्रमाची सुरवातीला नवर्षार्भिनंदन केले, संस्थेचे अध्यक्ष भाषण देत असताना मागील वर्ष हे खूप कठीण होते कोरोनारुपी भळभळती जखम दिली होती ही जखम भरून काढण्यासाठी आपणास काही नियमाचे पालन करावे लागले,तसेच कोविड -१९ महामारीने हाहाकार उडवून दिला पण न घाबरता सर्वानी आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली ,तसेच नवीन वर्ष हे सुखमय,मंगलमय जावो अशी उमेदीने झेप घेऊन नवीवर्षाची शुभेच्छा दिल्या.
कोविड -१९ चे भान ठेवून आणि नियमाचे पालन करून नवीन वर्षाचा-आनंदः घेतला, ह्या कार्यकार्मध्ये सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .