महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्तित होते.
सर्व प्रथम गुरुनानक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि सर्वानी गुरुनानक जयंती निमित्य अभीवादन करून शीख धर्मियांच्ये गुरु गुरुनानक देव ह्यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करण्यात येते तसेच शीख धर्माबद्दल शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि ”कली मही राम नाम सारू’चा ” उपदेश देणाऱ्या गुरु नानकदेव यांची जयंती साजरी करत सोमय्या पॉलीटेक्नीक चे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विदयार्थाना माहिती दिली .
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .