
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिकच्या हिवाळी परीक्षा २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला, यावर्षी १०० टक्के गुण घेत विद्याथी यशस्वी झाले तसेच ३८२ विद्यार्थी मेरिट मध्ये येऊन विक्रम नोंदवून गवसणी घालत सोमय्या पॉलीटेकनिकल कॉलेज चे नाव मोठे केले.
१०० टक्के गुण प्राप्त करणारा विद्यार्थी इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातून ओम हनुमान आसेकर आहे तसेच सिविल इंजिनीरिंग विभागातून दिबा शेख ९९.७८ टक्के गुण घेतले, स्नेहल निमगडे ९९.७८ टक्के गुण,सिमी अली ९९.२२ टक्के,इकमदिन कैझी ९८.५६ टक्के गुण,महेक ९८.५०,तसेच मेकॅनिकल विभागातून तृतीय वर्षाला शिकणारा मनीष स्वान ९९.६२ टक्के,इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग तृतीय विभागातून नीरज ढवळे ९९ तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी अक्षय देवगडे ९८.५ गुण,इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग दुतिय वर्षात शिकणारा विद्यार्थी नासिर शेख यांनी ९८.५९ टक्के गुण प्राप्त केले,तसेच संगणक विभागातून दुतिय वर्षातील स्वयम निमजे ९८.२७ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले.
तसेच उत्कृष्ट निकाल विद्यार्थ्याने १०० टक्के गुण घेऊन १ विद्यार्थी,९९ टक्के ६,९८ टक्के गुण ९,९७ टक्के गुण १७ विद्यार्थी,९६ टक्के गुण ३० विद्यार्थी तसेच ९५ टक्के गुण ३५ विद्यार्थी तसेच ८९८ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन सोमय्या पॉलीटेकनिकल सुरु केलेली १०० % निकालाची परंपरा संस्थेने टिकवून ठेवलेली आहे.
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री.प.एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,प्राचार्य श्री एम.झेड.शेख,रेजिस्ट्रार श्री बिसेन सर यांनी संस्थे तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
तसेच गेल्या काही वर्षांपासून संस्थाव्यव्सथापन आणि प्राध्यपक वर्ग विद्यार्थ्यांवर प्रचंड मेहनत घेत आहे. या मेहनतीचे सकारात्मक परिणाम निकालातून बघायला मिळत आहे.