
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर येथे सोमय्या पाॅलिटेक्नीकचे संस्थापक श्री. पी. एस.आंबटकर यांनी कोरोना लसीकरन करून कोरोना लसीचे गैरसमज दुर करून कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली.
जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरन मोहीम सुरू झालेली आहे. पण त्या विषयी संगळयांना शंका आहे, कारण दहा महिन्यात लस तयार झाली आहे, मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत परवानगी मिळाली नाही ना, अशा अनेक शंका सर्वाना आहे. मग ‘रोग नको, उपचारआवर, म्हणन्याची वेळ आलेली असून सर्वांना भीती वाटते, पण सोमय्या पाॅलिटेक्नीकच्या संस्थापकाने कोरोना लस घेवून सर्वांना लसीकरण्याबाबत आवश्यक ते नियम सांगत जनजागृती केलेेली आहे.
कोरोना व्हायरसपासून होणारा कोव्हिड-19 हा आजार आता महामारी ( पॅडेमिक ) जाहीर झालेली होती.जागतीक संकटाच्या काळात आपण एकत्र येवून लढायला हव असे सोमय्या पाॅलिटेक्नीक चे संस्थापक यांनी सांगितले. कोरोना व्हायरस हा कोव्हिड-19 झालेल्या आजारी रूग्णाला शिंका आलि किंवा खोकले तर त्यांच्या नाका तांेडातून बाहेर पडून हवेत येतो, आता जर तुम्ही त्याच्या आसपास असाल तर हा व्हायरस तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहेच, हा व्हायरस तुमच्या नाका-तोंडातून, डोळयातून तुमच्या शरीरात शिरतो, त्यामुळे आपल्याला मास्क लावण्याच्या आणि आपण सतत हात चेह-याला लावत असतो, म्हाणून हात स्वच्छ ठेवण्याची सूचना दिल्या जात आहेत.
कोव्हिडची लस घेतल्यावर तुम्हाला कोव्हिड -19 होणार नाही, तसेंच यामुळे कोरोनाचा संसर्ग तुम्हाला होणार नाही, उलट या रोगाबद्यल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगांपासून तुमचा बचाव होतो, तसेच रोज योगा करावे,कोविड-19 चे नियम पाळावे, स्वतःची काळजी घ्यावी, मास्क लावावे, हॅण्ड सॅनिटायझर सतत वापरत राहावे, तसेच स्वच्छता ठेवावे.असे नियम पाळून कोरोना लसीकरणाबद्यल जनजागृती करण्यात आली आहे.