महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात पण कोवीड-19 चे भान ठेवून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाकरीता प्रमुख संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर सर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर सर,प्राचार्य श्री.जमीर शेख सर,रजिस्टार श्री.राजेश बिसन सर,उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून,लगेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली
पहिल्या महिला शिक्षिका,समाजसेविका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिन म्हणून 3 जानेवारीला घोषित करण्यात आले.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्रा पासुन दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते,त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला व त्यांचे पती महाराष्ट्रातील महान समाज सुधारक दलितांचे उध्दारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खादयाला खांदा लावून त्याच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला व त्यांच्या या कार्यामुळेच आज समाजातील प्रत्येक मुलगी समाज स्वातंत्ररीत्या राहून शिक्षण घेत आहेत.
आज सामाजातील प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही महात्वाची भूमिका पार पाडत आहे,त्याचे उत्तम उदाहरण दयावयाचे झाल्यास आजच्या भारताच्या महीला संरक्षणमंत्री निर्मला सितारामण,पहिल्या राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील,स्वर्गीय इंदीरा गांधी यांनी सुध्दा भारत देशाचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रंतप्रधान असतांना एक विशिष्ट उंचीवर पोहचविले होते,असे अनेक उदाहरण देत आपले मत व्यक्त केले.
तसेच प्रत्येक क्षेत्रात महिलांनी रणरागिनी बनून प्रत्येक आव्हानांला उत्तर देण्यास सज्ज राहण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांनी केले.
विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणा-या महिलांचे उराहरण देवून त्यांचे अभिनंदन केले. सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेतील ( शिक्षिका )प्रा.बल्लमवार मॅम ,प्रा.सोनम मॅम,प्रा.माधवी मॅम,प्रा.स्नेहल मॅम,प्रा.पुजा मॅम,प्रा.प्रियंका मॅम,प्रा.तृप्ती मॅम,प्रा.प्रज्ञा मॅम,प्रा.मोहीनी मॅम,लॅयब्रियन भारती मॅम,यांनी महिलाबद्यल आपले मत व्यक्त करित ज्योतिक्रांती सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिन साजरा केला,उपस्थित कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व विभाग प्रमुख,शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.