विधानपरिषद निवडणूक नाराजी नाट्य एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावले,

0 0
Read Time:3 Minute, 52 Second

भाजपातला कलह चव्हाट्यावर

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
विधान परिषद निवडणुकीचे नेत्यांची तिकीट कापल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह पेटला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘एकनाथ खडसे यांनी पक्षात मार्गदर्शकाची भूमिका बजवावी’ असा सल्लावजा टोला लगावला होता. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर एकनाथ खडसे यांनी भाष्य करत पाटलांना भाजपमधील कामाची आठवण करून दिली.
खडसे म्हणाले की, ‘आज चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असले तरी त्यांच्या अगोदर मीच ती भूमिका बजावत होतो आणि मला सांगितलं तर पुढेही बजावत राहील’.तसंच, ‘पक्षाने मला भरपूर दिले आहे हे नाकारून चालणार नाही. पक्षाने भरपूर दिले आहे मात्र पक्षासाठी आम्हीही खूप खस्ता खाल्या आहेत. आमचं आयुष्य समर्पित केलं आहे याचा ही विचार करायला हवा. पक्षाचे ऋण कधीही विसरणार नाही. मात्र, आम्ही पक्षात आयात केले नेते नाही.
गोपीचंद पडवळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपसाठी काय केलं आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांचं काय योगदान आहे, अशी अनेक नावं सांगत येतील.

पक्षासाठी खस्ता खाणारे राहिले बाजूला आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिकीट दिले’ अशी नाराजी पुन्हा एकदा खडसेंनी बोलून दाखवली.

आयात नेत्यांमुळे आम्हाला डावललं गेलं म्हणून आम्ही पक्षाच्या पुढेही भूमिका मांडली आहे. पुढची भूमिका अजून ठरलेली नाही. कोरोना संकट दूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे काय करायचं आहे ठरवू, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांची एकनाथ खडसेंना ऑफर
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांना थेट ऑफर दिली आहे. ‘विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असेल. पण, लोकनेता, बहुजनांचा नेता दूर ठेवणे हा संघाचा विचार आहे. त्यामुळेच खडसेंना उमेदवारी दिली नसेल’, अशी एकनाथ खडसे यांनी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर भाष्य करत थोरात म्हणाले की, ‘ नाथाभाऊ म्हणाले की मी त्यांना संपर्क केला होता. तसं बघायला गेलं तर ते माझे जुने मित्र आहेत. आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत. जनमानस असलेला नेता आहे’ अशा शब्दात थोरात यांनी कौतुक केलं.
तसंच, जर काँग्रेसचे विचार स्विकारून ते आमच्या सोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू’ अशी ऑफरच थोरात यांनी खडसेंना दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post विधानपरिषद नाराजी नाट्य : खडसेच्या घरातच किती पदे द्यायची? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Next post विधानपरिषद नाराजी नाट्य : एकनाथ खडसे भडकले ! तिकीट नको म्हणून माझी मुलगी ढसढसा रडत होती, का दिलं ?

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News