मान्सून मुंबईत ११ जूनला होणार दाखल ; स्कायमेटची माहिती

0 0
Read Time:3 Minute, 6 Second

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. त्यानुसार, मान्सून कोलकाता आणि मुंबईत ११ जून रोजी, तर दिल्लीत २७ जून रोजी दाखल होईल.
देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. १९०१ ते १९४० दरम्यान देशातील १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या.मात्र, गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहेत. ते लक्षात घेऊन मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून जोर धरत होती. परिणामी, हवामान खात्याने १९६१ ते २०१९ दरम्यान ५८ वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. तर १९७१ ते २०१९ दरम्यानच्या ४८ वर्षांच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल केले.
त्यानुसार, मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशातील परतीच्या पावसाची तारीख १५ आॅक्टोबरच ठेवण्यात आली आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही.

परतीचा प्रवास ८ आॅक्टोबरला
च्मान्सून मुंबईत दाखल होण्याची यापूर्वीची तारीख १० जून होती. आता ती ११ जून आहे.
च्मान्सून मुंबईतून ८ आॅक्टोबरला परतीचा प्रवास सुरू करेल. परतीच्या पावसाची यापूर्वीची तारीख २९ सप्टेंबर होती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post सोनियांच्या पत्रानंतर काही तासांमध्येच विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट
Next post ….असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही,

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News