
यवतमाळ : वणी वरून 6 किमी अंतरावर असलेल्या राजूर कॉलरी येथे डी पी वरील शॉर्ट सर्किट मूळे लगत असलेल्या सहा दुकानाला आग लागून भस्मसात झाल्याची घटना 24 मे ला दुपारी 3 वाजताचे सुमारास घडली या आगीत व्यवसाईकांचे मोठे नुकसान झाले आहे
राजूर बुद्ध विहार समोर असलेल्या जुन्या आठवडी बाजारातील वीज मंडळाच्या डी पी ला दुपारी 3 वाजताचे दरम्यान झालेल्या शॉर्ट सर्किट मूळे शेजारी लागून असलेल्या दुकानांना आग लागली. उन्हाळा व प्रचंड उष्णतामान असल्याने तीव्र पणे आगीने रौद्र रूप धारण केले सहा दुकाने 5 मिनिटात जाळून खाक झाली.
आग लागल्या बरोबर स्थानीय जनतेनी पाणी आणून टाकल्याने आग विझवली परंतु तोपर्यंत दुकाने जळाली होती. ताबडतोब अग्निशमन वाहन आल्यानंतर पुन्हा पाण्याच्या फवाऱ्याने आग पूर्णपणे विझविण्यात आली.
आग लागल्याबरोबर गावातील पोलीस पाटील घटनास्थळी हजर होऊन त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन विभागाला संपर्क केला व स्थानिक जनतेला घेऊन पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढण्यास प्रतिबंध झाला.