
नागपुर : गोंदिया वनविभागतील वनपरिक्षेत्र गोरेगाव येथे येणाऱ्या मुंडीपार बिट अंतर्गत गराडा गावानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ४३९ संरक्षीत वन येथे लक्ष्मणराव चंद्रीकापुरे यांच्या मालकीच्या शेतजमिनीत लावलेल्या तारांच्या कुंपणात शनिवारी (ता२३) सकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान बिबट्या फास लागून मूत झाल्याची घटना प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक आर आर सतगीर, वनपरीक्षेत्राधीकारी प्रविण साठवणे यांनी केला आहे.
गराडा गावाजवळील जंगल परिसरात असलेल्या लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्या शेतशिवाराचे वन्य प्राणी यांच्या पासुन संरक्षणासाठी शेताच्या भोवताली तारांचा कुंपण लावलेला आहे. याच तारांच्या कुंपणात बिबट फास लागून मृतावस्थेत आढळून आला आहे.
या मूत बिबट्याची माहीती वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली असता घटनास्थळी पशु वैद्यकीय अधिकारी सी डी मालापुरे, सहाय्यक एस डब्लु राऊत मूत बिबट्याचे शवविच्छेदन केले.या तपासणीत बिबट्या चे सर्व अवयव साबुत दिसुन आले. दफनविधी मुरदोली येथील वन परिसरात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे दिपक परमार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्राधीकारी प्रविण साठवणे यांनी दिली.