पुण्यात डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

0 0
Read Time:2 Minute, 26 Second

 

पुणे : पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे डॉक्टरने प्राण गमवल्याची ही पुणे शहरातील पहिलीच घटना आहे

संबंधित 59 वर्षीय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होते. मात्र, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत

कोरोनाविरोधाच्या लढाईत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. मात्र, आता डॉक्टर, नर्सेस यांनाच कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतही कोरोनामुळे एका नामांकित डॉक्टराचा मृत्यू झाला होता. मुंबईतील कोरोनाने डॉक्टरचा मृत्यूची ती पहिली घटना होती. त्यापाठोपाठ आता पुण्यातही एका खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार करणारे डॉक्टरच आता कोरोनाचे बळी ठरल्यामुळे चिंता वाढली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. पुणे जिल्ह्यात काल (22 मे) दिवसभरात सर्वाधिक 358 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 167 वर पोहोचला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 257 रुग्णांचा बळी गेला आहे. पुण्यात आतापर्यंत 2 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post चंदपुर बाबुपेठ परिसरात शनिवारी आणखी एक कोरोना पाझिटीव्ह रूग्ण मिळाळा. आता एकुण संख्या तेरा झाली आहे.
Next post सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे खाक

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News