
चंद्रपूर: मूल येथील किरकोळ व्यावसायीकांनी आर्थिक परिस्थितीला तंग होवून विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक हा घरचा कर्ता आणि एकमेव कमविता असल्यांने, त्याचे आत्महत्येनंतर, त्याचे कुटूंबिय उघडयावर आले आहे.
मूल शहरातील वार्ड नं. 1 मधील लोमेश गेडाम (42) याचा मूल येथील बस स्थानकासमोर पान ठेल्याचा व्यवसाय होता. कोरोणाच्या लॉकडाऊनमुळे मागील दोन महिण्यापासून हा रोजगार ठप्प झाला. लोमेशला सिकलसेल व किडणीचा आजार होता अशातच हातात कोणताही रोजगार नसतांना घरी, लकव्याने आजारी असलेली आई, विधवा बहिण व तीची मुलगी या साऱ्यांचा सांभाळ करणे त्याला अशक्य झाल्यांने त्यानी घराजवळील शेतात असलेल्या विहीरीत उडी घेवून आपली इहलोकयात्रा संपविली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी घरी व विहीरीजवळ अशा दोन चिठ्या लिहून, आजारांने त्रस्त होवून आत्महत्या करीत असल्यांचे कारण त्यानी सांगीतले. या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरण्यात येवू नये असेही नमुद असल्यांचे प्रत्यक्षदर्शीने आमचे प्रतिनिधीस सांगीतले.
लोमेशच्या आत्महत्येमुळे, त्याचेवर अवलंबलून असलेले कुटूंब उघड्यावर पडले असून, सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.