
चंद्रपूर : मागील दोन महिन्यापासुन देशभरात ताळेबंदी , संचारबन्दी, जिल्हाबंदी जाहीर झालेली होती.
त्यात प्रशासनाने सूट दिल्यामुळे चहा टपरी पासून ते इतर दुकाने सकाळी 10 ते 05 पर्यन्त शुरू करण्यात येत आहे.
मात्र पान टपरी चालकाना दुकान उघडण्याची परवानगी नसल्यामुळे हे पान टपरी धारक दुकाना शेजारी उभे राहून भाऊ खर्रा पाहिजे का?
साहेब खर्रा पाहिजे का अशी विचारणा करतात.
घुग्घुस येथील ठानेदार राहुल गांगुडे हे साध्या वेशात रसत्याने तोंडाला मास्क बांधून जात असतांना एका पान टपरी चालक युवकाने ठाणेदारालाच साहेब खर्रा पाहिजे काय ?
अशी विचारणा केली आणि आपण विचारणा केलेले गृहस्थ साक्षात ठाणेदार आहे लक्षात येताच त्याची भंबेरी उडाली व त्याने तेथून पोबारा केला मात्र त्याचा पत्ता काढून ठाणेदारा समोर उभे केले असता त्याला जन्माची अद्दल घडविल्याची घुग्घुस येथे चर्चा असून हे खर्रा विक्रेते संपूर्ण गावात खर्रा विक्री करीत असून हे कोरोना पसरवतील अशी घुग्घुसकर जनतेला भीती वाटत आहे.
यांच्या थुकन्यामुळे सर्व सामान्य नागरिकाचे जीवन धोख्यात आलेले आहे.