

इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विधार्थीनीचे टेबलटेनिस सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजची विधार्थिनीनि उत्कृष्ट प्रदर्शन करून ज़िल्हा स्तरीय निवड झाली असून संस्थेचे नाव मोठे केले,ज़िल्हा स्तरीय निवड झालेल्या विधार्थिनी पलक दिलीप रामटेके संघनक विभागातील तृतीय वर्षाला शिकत आहे त्यानंतर लक्ष्मी सुनील भोयर मिनिंग तृतीय विभागातील,नंदिनी अशोक अहिरकर मिनिंग द्वितिय विभागातील यांनी निवड झाली , हि स्पर्धा तायवडे कॉलेज ऑफ नर्सिंग कोराडी,जिल्हा नागपूर येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली, या स्पर्धेतमध्ये नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली पॉलीटेक्नीक कॉलेज आणि फार्मसी संघानी भाग घेतला होता.
सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजची अनेक विधार्थिनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला, त्यामध्ये अनेक क्रीडा स्पर्धात विजेते,उपविजेते ठरले आहे,ज्यात टेबल,बॅटमिंटन, इत्यादी स्पर्धेत जवळपास ३० ते ३५ संघानी भाग घेतला होता,तसेच टेबलटेनिस या स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विधार्थीनी विजेते ठरले, विजयी संघ यांचे चयन राज्य स्तरीय स्पर्धेत झाले आहे,या स्पर्धेत खेडाडुनी उत्कृष्ठ कौशल्य,एकाग्रता आणि खेळभावना दाखवत सर्वांची मन जिंकली आहे.
विधार्थीनीच्या यशाबद्धल अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख ,उपप्राचार्य अनिल खुजे ,रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
तसेच क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि प्रा.धनश्री कोटकर तसेच टीम प्रबांधक प्रा.नॅन्सी राऊत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली मौलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले,तसेच सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन केले.
