सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज चंद्रपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिला दिन समारंभास अतिथी मिस दुर्गा चवरे (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) यांनी विधार्थाना केले मार्गदर्शन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज वडगाव, चंद्रपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा  करण्यात आला ,तसेच सावित्रीबाई फुले याना आदरांजली देण्यात आली.

“जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी… पण आता जिच्या हाती विज्ञानाची दोरी, ती प्रगतीची शिखरे सर करी!”

सोमय्या अभियांत्रिकी ‘जागतिक महिला दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक कु. दुर्गा चवरे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थिनींना प्रशासकीय आणि तांत्रिक क्षेत्रात भरारी घेण्याचे आवाहन केले.

व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संस्थापक श्री.पी.एस आंबटकर, उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर प्रा.डॉ.हजारे विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला सावरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

प्रमुख पाहुण्या कु. दुर्गा चवरे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना सांगितले की, “आजच्या युगात इंजिनीअरिंग आणि प्रशासन ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. मुलींनी स्वतःला केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी.” डॉ. उज्ज्वला सावरकर यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि शिक्षणातील जिद्दीवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींनी सांभाळलेली धुरा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन AIML शाखेच्या विद्यार्थिनींनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी CSE शाखेची विद्यार्थिनी श्रुतिका तुरणकर हिने उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous post सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज चंद्रपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेत विधार्थांचा उत्साहात सहभाग

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News