
मात्र सामाजिक अंतराची थट्टा
घुग्घुस :- महाराष्ट्र हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून देशात सर्वाधिक संक्रमित रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. म्हणून या महामारीला रोखण्यासाठीच प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करित आहे.
प्रशासन तसेच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात 144 कलम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पांच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव केला असून सर्व प्रकारचे राजकीय,सामाजिक, धार्मिक, आयोजन सभा व कार्यक्रम घेण्यास प्रतिबंद लावला आहे.
या आजाराला पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्यामुळे त्यांच्या रक्षणा करीता आज दिनांक 16 में रोजी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पक्षा तर्फे पोलीस कर्मचारी यांचे कोरोना पासून रक्षण व्हावे याकरीता आरोग्य किटचे वितरण करण्यात आले.
मात्र यावेळीस सामाजिक अंतराचा सर्वानाच विसर पडला विशेष म्हणजेच यावेळीस घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गांगुडे जिल्हापरिषद माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ, नीतू चौधरी, माजी समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे,पंचायत समिती उपसभापति निरीक्षण तांडरा,प्रभारी सरपंच संतोष नुने, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, भाजपा अध्यक्ष विवेक बोढे व मोठ्या प्रमाणे भाजपा पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. मात्र ज्यांच्यावर महामारी रोखण्याची जवाबदारी आहे तेच बेजाबदारिने वागत असल्यामुळे नागरिकात नाराजीचे सुर उमटले आहे.