
चंद्रपूर जिल्हयात 2072 बुथवर झाले महाराष्ट्र बचाओ आंदोलन
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा महाराष्ट्रातील वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्णसंख्या व लॉकडाऊनच्या परिस्थीतीत सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात राज्य शासनाला आलेले अपयश लक्षात घेता निष्क्रीय महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपातर्फे राज्यभर महाराष्ट्र बचाओ आंदोलन छेडण्यात आले. चंद्रपूर जिल्हयातील सर्व शहर व तालुका स्तरावर हे आंदोलन सोशल डिस्टंसींग पाळत करण्यात आले.
चंद्रपूर महानगरात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेवून, तोंडाला काळे मास्क व काळया फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला. महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, विजय राऊत, माजी महापौर अंजली घोटेकर, रामपाल सिंह आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर तालुक्यात माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, नामदेव डाहूले, नितू चौधरी, विवेक बोढे यांनी आंदोलन केले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जि.प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या नेतृत्वात सौ. रेणुका दुधे, सौ. रत्नमाला भोयर, काशीनाथ सिंह, किशोर पंदिलवार, गजानन गोरंटीवार, प्रभाकर भोयर, हनुमान काकडे, मनिष पांडे, रमेश पिपरे, चंदू मारगोनवार, नंदकिशोर रणदिवे आदींनी आंदोलन केले. वरोरा येथे नगराध्यक्षा अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात सुरेश महाजन, बाबा भागडे, ओमप्रकाश मांडवकर, प्रविण सातपुते, नरेंद्र जिवतोडे, किशोर गोवारदिवे, प्रशांत डाखरे, विलास गणेवार, मधुकर ठाकरे आदींनी आंदोलन केले.
चिमूर येथे आ. किर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांच्या नेतृत्वात डॉ. शाम हटवादे, संतोष रडके, निलम राचलवार, प्रा. उमाजी हिरे, गणेश तर्व्हेकर आदींनी आंदोलन केले. राजुरा विधानसभा क्षेत्रात माजी आमदार संजय धोटे आणि सुदर्शन निमकर यांनी जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, सतिश धोटे, नारायण हिवरकर, बबन निकोडे, केशव गिरमाजी, महेश देवकते आदींनी आंदोलन केले. ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात माजी आमदार अतुल देशकर यांच्या नेतृत्वात रामलाल दोनाडकर, राजू पाटील बोरकर, नागराज गेडाम, अविनाश पाल, सतिश बोम्मावार, दिलीप ठिकरे, मनोज भुपाल, मनोज वठ्ठे, अरविंद नंदूरकर, माणिक पाटील थेरकर आदींनी आंदोलन केले.
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर जिल्हा शाखेअंतर्गत एकूण 2072 बुथवर आंदोलन करण्यात आले. 5640 बुथ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. 1835 कुटूंब या आंदोलनात सहभागी झाले. सोशल डिस्टंसींगचे काटेकोरपणे पालन करत तोंडाला मास्क लावून हे आंदोलन करण्यात आले.