सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर यांचा हस्ते रुग्णांना जीवनावश्यक वस्तूची वितरण

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे गरजू रुग्णांना संस्थेतर्फ सचिव  सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर यांचा हस्ते  जीवनावश्यक वस्तूची वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासून मदतीचा हात दिला आहे .

यावेळी  संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर,डॉ.शीतल कोलपाकवार ,प्राचार्य राजदा सिद्धंकी उपस्थित होत्या.

तसेच  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने लॉक डाऊन सुरु झाले होते तेव्हा दररोज ५०० जणांना सकाळी संध्याकाळी भोजन सेवा दिली जात होती तसेच  जीवनावश्यक वस्तूची किटचे वाटप करण्यात आले होते ही स्वयंसेवा संस्थेतर्फ गरजूना मदतीचा हात नेहमीच हि संस्था करीत आहे .

चंद्रपूरात  एका  महिन्यात दोनदा  जागतिक विश्व विक्रम करण्याचा ध्येय पूर्ण  श्री. पी. एस आंबटकर यांनी पूर्ण केले , तसेच सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन येथे विधार्थांकडून जागतिक  शांततेचा विश्व विक्रम जगात शांततेचा संदेश देणारी एकमेव संस्था आहे .

सेवाभाव वृत्ती प्रत्येकाच्या अंगी असलेच याची खात्री नाही , आयुष्यात केवळ पैशाला सर्वस्व मानून स्वतः पुरतेच जगणाऱ्याची संख्या बरीच असताना काही व्यक्ती आपल्या उत्पनातील काही हिंसा गरजूंच्या कल्याणासाठी वापरतात , संकटातील अडकलेल्या व्यक्तींना मदत करणारी एकमेव शिक्षण संस्था म्हणून  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाची ओळख निर्माण झाली असून हजारो गरजू रुग्णांना मदत करून मोलाचे योगदान दिले आहे.

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग येथे मायनिंग अँड माईन सर्वेर्यींग विभागातर्फ मॉडेल प्रदर्शनचे आयोजन
Next post मॅकरूण स्टूडटंस अकॅडमी सीबीएसई स्कुल वडगाव, चंद्रपूर येथे एस.एस.सी. परीक्षेचा १०० टक्के निकाल

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News