सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेत विधार्थांचा उत्साहात सहभाग

                                                          महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या  डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज वडगाव चंद्रपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून विविध तांत्रिक विषयांवर आकर्षक पोस्टर्स सादर केले.

स्पर्धेमध्ये वैभव आंबाडे (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष) याने प्रथम क्रमांक, तर नेहा रामटेके (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अंतिम वर्ष) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

स्पर्धेतील विजेत्यांना डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.जमीर शेख , उपप्राचार्य प्रा.अनिल खुजे, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व तांत्रिक ज्ञानाचे सर्वांनी कौतुक केले.

तसेच या स्पर्धेचे आयोजन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख अमित दे. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.मिथुन डे , प्रा.धनश्री कोटकर, प्रा. नौशाद सिद्धकी आणि  प्रा.स्नेहा बोन्डे यांनी समन्वयक म्हणून विशेष परिश्रम घेतले.

या यशासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर आणि विध्यार्थांनी अभिनंदन केले.

Previous post सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज चंद्रपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी AI Trainer साठी मेगा कॅम्पस ड्राइव्ह मध्ये सुवर्ण संधी……

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News