सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती व मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि येथे जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रम

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती तसेच मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती  येथे  ‘’जागतिक  महिला  दिन’’  साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य राजदा सिद्धकी, प्राचार्य डॉ.शीतल कोलपाकवार (कापर्तीवार) उपस्थित होते.

 

संस्थेचे संस्थापक श्री.पी.एस आंबटकर यांनी  जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, हयांनी विद्यार्थ्यांनसमोर आपले मनोगत व्यक्त्त केले, जागतिक महिला दिनाचे विशेष म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान त्यांनी केलेल्या कार्याची उपलब्धी त्यातून समाजातील इतर महिलांनी केली आहे. डॉ.टेसी थॉमस ही पहिली भारतीय महिला आहे,देशातील मिसाईल प्रोजेक्ट मध्ये काम करीत आहे,डॉ किरण बेदी भारतीय पोलीस सेवेमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी पदावर असून ज्यांनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल रमण मैगसेस पुरस्कार देण्यात आला. भारताच्या पंतप्रधान इंदीरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, गानकोकिळा लता मंगेशकर,  सुषमा स्वराज, उमा भारती, ममता बॅनर्जी यांनी सामाजिक,राजकीय,आर्थिक ,सांस्क्रुतीक तसेच भारतीय प्रसाशकीय सेवा, वैदयकीय क्षेत्र,  अभियांत्रिकी क्षेत्र, स्वरंक्षण दले,अशा कित्येक महिलांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा निर्माण केला आहे.

                                                           तसेच आंतराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या हक्काच्या चळवळीचे प्रतीक असून त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो,सर्वत्र बदल घडवायच्या असेल तर शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,प्रशासकीय व आर्थिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना स्थान मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले.तसेच महिलांना त्यांच्या अधिकारावीषेय जागृत करणे गरजेचे असेही त्यांनी मार्गदर्शन केले,महिला दिनाविषयी बोलत असताना,महिलांचा सन्मान,आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करतात,आज महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात,मात्र पहिले असे नव्हते,पुर्वीच्या महिलांना शिक्षण,नौकरी आणि मतदान करण्याचा अधिकार नव्हता,आंतराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा जागतिक दिन म्हणून निश्चित करण्यात आला .

तसेच जागतिक महिला दिवसा निमित्य सर्व डॉ.महिलांचा,प्राध्यपकवर्ग आणि शिक्षक व शिक्षकेत्तर  महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्याना पुष्पगुछ आणि उपहार देऊन गौरविण्यात आले.

Previous post सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चंद्रपुरात लावणीचा ” गिनीज ” रेकॉर्डमध्ये नोंद
Next post सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज चंद्रपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News