
दिनांक ३/१०/२०२५ रोजी सोमय्या वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय सुमठाना भद्रावती येथे जेष्ठ नागरीक नि:शूल्क आरोग्य तपासणी शिबीर (Geriatric ) ओ.पी.डी.चे शुभारंभ प्रमुख अतिथी सोमय्या आयुर्वेद वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयचे चेअरमन श्री.पांडुरंग आंबटकर यांचा हस्ते रिबीन कापून शुभारंभ करण्यात आले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कोलपाकवार (कापर्तीवार) यांनी जेष्ठ नागरिकांना निरोगी राहण्यास मार्गदर्शन केले व त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे आयुर्वेदिक डॉक्टर यांनी जेष्ठ नागरिकांचे तपासणी केले त्याच प्रमाणे
त्यामध्ये
१) जेष्ठाना सर्व प्रकारचे वात विकार त्यामध्ये ( अंगदुखी,सांधेदुखी,गुढघेदुखी,कंबरदुखी आदी )
२) जुनाट आजार ( सर्दी,खोकला,दम लागणे )
३) पोटाचे विकार
४) उच्चरक्त दाब
५) सियाटिका/ आर्थरायटीस ,फ्रोजन शोल्डर
६) मधूमेह
७) वेदनामक चिकित्सा ( कपिंग थेरपी,अग्निकर्म,फिजिओथेरपी ) इत्यादी रोगावर जेष्ठ नागरिकांना मोफत उपचार आणि सेवा देण्यात आल्या.
सर्व जेष्ठ नागरिकांना पंचकर्मा आणि आयुर्वेदिक उपचारमध्ये ५० टक्के सूट देण्याची घोषणा महाविद्यालयाचे चेअरमन श्री.पांडुरंग आंबटकर यांनी केले त्यासाठी नागरिक संघ,योद्धा संघ व विवेकानंद संघ यांनी सोमय्या आयुर्वेद वैधकीय महाविद्यालय आभार मानले.
