महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथे MSPM गृपने भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ,या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. प्रीती आंबटकर,  डायरेक्टर सौ. अंकिता पियुश आंबटकर, सौ प्रांजली रघाताटे, डॉ.पायल पी.आंबटकर ,प्राचार्य शोभना मॅडम, प्राचार्य श्री. फैयाज सर, उपप्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य राजदा मॅडम,  प्राचार्य अश्विनी मॅडम , प्राचार्य श्री. जोगे सर, प्रा.पिंपळकर सर,प्रा.राजकुमार सर, ,  रजिस्ट्रार श्री. बिसन सर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वल करुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन च्या प्रतिमेला तसेच माँ भवानी, माँ सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, शिक्षकदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन करीत असतांना,

                              विद्याजर्न करणारे विध्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत,शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विध्यार्थ्यांवर सुसंस्कार,नितमूल्य,साकारत्मक जिवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे,त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहे,प्रत्येक विध्यार्थी स्वातंत्र तेज,बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो,त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विधार्थांमधील सप्तगुण हेरून त्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो ,असे मत  संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर  यांनी व्यक्त केले.

शिक्षक दिन प्रथमतः आई या गुरुला नंतर माझ्या वडील या गुरुना आणि ज्यांनी माझ भविष्य घडविले त्या तमाम शिक्षकाला , देवांना नमन, तसेच  शिक्षक दिनानिमित्य शिक्षकाचा उत्साह स्पूर्ती वाढण्याकरिता दरवर्षी आयोजन करण्यात येते, तरी यावर्षी डॅन्स, गायन फॅन शो अशे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. विविध गु्रपमधील शिक्षकांनी आपली कला सादर केली.

शिकवता शिकविता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ देनारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक…. शिक्षक विविध शाळा व कॉलेजाला प्रोत्साहन पद आणि पहिला दुसरा तिसरा क्रमांक देण्यात आला. तसेच उत्कृष्ट  शिक्षक कार्याबद्दल प्रोत्साहनपर मानचिन्ह देण्यात आले.

गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट वणी नितेश सर आणि ग्रुप , दुसरा क्रमांक मॅकरून कॉन्व्हेट भद्रावती आणि आयटीआय भद्रावती तसेच तृतीय क्रमांक परमॉन्ट कॉन्व्हेंटआणि  आयटीआय चंद्रपूर  याना पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले,

नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोमय्या पॉलिटेक्नीकचे कॉलेज वडगाव चंद्रपुर यांनी पटकावला यांनी तसेच दुसरा क्रमांक मॅकरून स्टुडन्ट भद्रावती अकॅडमी व तृतीय क्रमांक मॅकरून कॉन्व्हेट वणी,नर्सिंग,आयटीआय ग्रुप याना मिळाला .

तसेच फॅशन शो / रॅमवॉक परमॉन्ट कॉन्व्हेंट ,आयटीआय  बाबुपेठ चंद्रपूर ग्रुपने पहिला क्रंमाक मिळविला , दुसरा क्रंमाक सोमय्या पॉलिटेक्नीकचे कॉलेज वडगाव चंद्रपुर याना मिळाला , तृतीय क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट भद्रावती ग्रुप  यांनी पटकावला,तसेच संस्थेतील उत्कृष्ट  शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमा करीता सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले.

Previous post मनपा स्तरीय कॅरम स्पर्धेत मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी निवासी शाळेच्या विध्यार्था मंथन मेश्राम याची निवड
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे गणेशविसर्जन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News