महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक,मॅकरून स्टूडेंट अॅकेडमी आणि ज्युनिअर सायन्स काॅलेज, प्रायव्हेट अय.टी.आय., यांचा संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, रजिस्टार राजेश बिसन, प्राचार्य श्री. रोशन रामटेके, प्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य मनिष हिवरे, मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर हयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर माता सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर मार्गदर्शन करित असतांना 26 जानेवारी हा गणराज्य दिन म्हणून ओळखला जातो, भारताला ब्रिटीश राजवटी पासून 15 आॅगष्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले, यामागे भारताचा स्वातंत्र लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पध्दतीचा मोठा सहभाग आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली एक संमीती नेमली गेली, बरेच विचार विमर्श करून 26 जानेवारी रोजी संपूर्ण राष्टाªसाठी संविधान लागू करण्यात आले, भारताची राज्यघटना या दिवशी अंमलात आली, भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे. या संविधानाने सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिलेला आहे. या संविधानाने आपले हक्क आणि अधिकरांसाठी लढण्याची ताकद दिलेली आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत, भारतीय संविधानाने दिलेली हि खूप अनमोल ताकद आहे. भारत हा खूप शक्तीशाली देश आहे. प्रजासत्ताक दिवस हा एक प्रकारे भारताचा राष्ट्रीयउत्सव आहे,म्हणून आपण साजरा करतो.
हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.